पुण्याच्या मध्यवस्तीतील श्रीनागेश्वराचे मंदिर म्हणजे पुणे शहराच्या जडणघडणीचा जिवंत इतिहास. हा इतिहास जतन करण्यासाठी आणि हा वारसा जपण्यासाठीश्रीनागेश्वराचे मंदिर टिकविणे आवश्यक होते. त्यासाठी मी या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा ध्यास घेतला. पुरातत्व खात्याच्या अखत्यारीतील श्रीनागेश्वराच्या मंदिराचे नवनिर्माण करून दाखविले. माझ्या अथक प्रयत्नांनी आणि महापालिकेच्या खर्चाने पुन्हा दिमाखात उभी राहिलेली ही वास्तू भाविकांसाठी खुली झाली आहे.