
ट्रॅफिकमुक्त वाहतूकीसाठी उड्डाणपुलांचे जाळे
पुण्याच्या सर्वांगिण विकासासाठी गेली काही वर्षे सातत्याने चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे वाहतूक कोंडी. एकीकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करताना दुसरीकडे पुण्याचा भविष्यातला विस्तार लक्षात घेऊन शहरात उड्डाणपुलांचे जाळे तयार करण्यात आले आहे. यामुळे पुणेकरांचा रोजचा प्रवास हा सुसह्य होणार आहेच त्याबरोबर पुणे शहरातील वाहतूक कोंडीचे प्रश्न कायमचे सुटणार आहेत. चांदणी चौक, कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता येथील उड्डाणपुलांचे काम पूर्ण झाले असून कात्रज चौक, पुणे विद्यापीठ चौक, गोल्फ क्लब चौक, कल्याणीनगर येथील उड्डाणपूलांचे काम हे अंतिम टप्प्यात आहे. सभागृह नेता म्हणून काम करताना या उड्डाणपूलांसाठी मी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे पुण्यातील वाहतूक वेगवान झाल्याचे चित्र भविष्यात नक्कीच दिसेल.

