
गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महानगरपालिकेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे माझ्या कारकिर्दीत अनावरण
पुणे महानगरपालिका स्थापन होऊन ७० वर्षे झाली, मात्र महानगरपालिकेत आदरणीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नव्हता. ज्या महामानवाने आपल्याला राज्यघटना दिली, त्यांच्या कार्याची कायम आठवण राहावी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पुणे महानगरपालिकेत उभारण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
डॉ. आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली, दलित–अदिवासींना न्याय दिला आणि सर्व समाजाला एकत्र आणून देशाच्या विकासासाठी संविधान तयार करण्याचे कार्य केले, याची आठवण या पुतळ्यामुळे कायम राहील.


