शहरांमधील कचऱ्याचे व्यवस्थापन हा अत्यंत जिकिरीचा आणि दैनंदिन नियोजनाचा विषय आहे. कचरा दररोज निर्माण होत जातो आणि अशा हजारो टन कचऱ्याची विल्हेवाट लावणे, हे आव्हानात्मक असते. ओला कचरा, हॉटेलमधील कचरा, ई–कचरा, जैव कचरा असा विविध प्रकारचा कचरा निर्माण होत असताना त्याचे व्यवस्थापन करण्याचे काम केवळ मनुष्यबळावर साधणारे नाही,