
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे माझ्या कारकिर्दीत अनावरण
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुणे महानगरपालिकेत नव्हता. ज्यांच्यापासून अवघा भारत देश प्रेरणा घेतो त्या शिवछत्रपतींचा पुतळा महानगरपालिकेत असायलाच हवा, या भावनेने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महानगरपालिकेत सभागृह नेता म्हणून उभारण्याची संधी मिळाली, याचा अभिमान आहे. पुणे महानगरपालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.


