
पुणे महानगरपालिकेची स्वत:ची रक्तपेढी : कै. मधुकर सखाराम बिडकर ब्लड बँक
माझ्या पुढाकारातून उभारण्यात आलेली ‘कै. मधुकर सखाराम बिडकर ब्लड बँक’ ही पुणे महानगरपालिकेची स्वत:ची पहिली रक्तपेढी आहे. २,२०० स्क्वेअर फूट जागेत विस्तारलेल्या या रक्तपेढीचे वैशिष्ट्य म्हणजे, ही रक्तपेढी २४ तास सुरू असते. या रक्तपेढीचे संचालन ‘पूना मेडिकल रिलिफ अँड रीसर्च फाऊंडेशन’तर्फे करण्यात येत आहे. महानगरपालिकेची स्वत:ची अशी एकही रक्तपेढी नव्हती. रक्तासाठी प्रत्येक वेळी इतर रक्तपेढ्यांवर अवलंबून राहावे लागत होते. ही गरज ओळखून महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात रक्तपेढीची तरतूद केली आणि ‘कै. मधुकर सखाराम बिडकर ब्लड बँक’ प्रत्यक्षात आली.





