गणेश पेठ दूधभट्टीचा परिसर म्हणजे दूध व्यवसायाच्या उलाढालीचे मोठे केंद्र आहे. येथे कायम दूध व्यावसायिकांची वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी आधुनिक सोयी–सुविधांनीयुक्त अशी आधुनिक इमारत उभारण्याचे काम सुरू करण्यात आले. यासाठी मी अडीच कोटी रुपयांची निधी खर्च केला असून, उभ्या राहिलेल्या नव्या दूधभट्टीच्या इमारतीत आता दूध व्यावसायिकांना दुधाचे कॅन थेट दुसऱ्या मजल्यावर नेता येणार आहेत. या इमारतीत पार्किंगची सोयदेखील आहे. या नव्या इमारतीमुळे आता दूध व्यावसायिकांना आधुनिक सोयी–सुविधा पुरविणे शक्य होणार आहे.