
पुणेकरांचे आरोग्य जपणारा - जायका प्रकल्प
महानगरपालिकेतर्फे हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. ‘जायका प्रकल्पा’अंतर्गत शहरातील १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते नदीत सोडले जाते. ‘जायका प्रकल्पा’साठी ११ नव्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची आणि इतर पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे शहरात तयार होणाऱ्या सांडपाण्यापैकी एक थेंबही नदीत जाणार नाही. हा प्रकल्प पुणे शहराच्या पर्यावरणासाठी अत्यंत लाभदायी असणार आहे.
- ११ नवे सांडपाणी प्रकल्प
- १२३८ ‘एमएलडी’ निर्माण होणारी एकूण सांडपाणी प्रक्रिया क्षमता
- १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया
- ९९० कोटी रुपयांचे केंद्र सरकारला कर्ज
- ८५ टक्के रक्कम प्रकल्पाच्या मूळ रकमेपैकी पुणे महापालिकेस अनुदान



