सस्नेह नमस्कार!
मी सार्वजनिक जीवनात गेली ३० वर्षे काम करणारा कार्यकर्ता. गेली ४ टर्म तुमच्या सर्वांचा लोकप्रतिनिधी. तुम्ही हक्काने माझ्याकडे येता आणि समस्या मांडता. त्या सोडविताना माझ्या मनात, कुटुंबीयांचे काम करतो आहे, ही भावना असते.
तुमचे आशीर्वाद, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास या बळावर अवघ्या पुण्याच्या विकासासाठी काम करण्याची संधी लाभली. त्यातून काय घडले, तर पुण्याच्या भवितव्यासाठीच्या प्रकल्पांचा पाठपुरावा करता आला.
मेट्रो आली, नदीकाठ सुधारणा प्रकल्प सुरू झाला. ‘२४ x ७’ समान पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आली. आरामशीर आणि सुखद प्रवासासाठी इलेक्ट्रिक बसेस ताफ्यात आल्या. अशा अनेक गोष्टींसाठी योगदान देता आले. प्रभागातही बहुतेक सर्व रस्ते काँक्रीटचे झाले. जल आणि मलवाहिन्या बदलण्यात आल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळेविस्तारले. पोलिसांचे पेट्रोलिंग आधुनिक सायकलींद्वारे सुरू झाले. हजार वाहने पार्क करता येईल असा वाहनतळ पुण्यात आपल्या प्रभागातच झाला. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर मेघडंबरी उभारली. श्रीनागेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार झाला. ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’सारखी योजना सुरू करून नागरिकांच्या प्रत्येक समस्येवर उपाय शोधणारे कार्यक्षम कार्यालय आपण सारे अनुभवता आहात.
आपल्या प्रभागात यंदा काही भौगोलिक बदल झाले आहेत. त्यात श्री कसबा गणपती परिसर भागाचा समावेश झाला आहे. हा भाग तर आपल्या पुण्याचे काळीज आहे. श्रीगणेशाचे आशीर्वाद, शिवछत्रपतींची प्रेरणा आणि डॉ. बाबासाहेबांची प्रज्ञा या बळावर अजून खूप मोठी वाट चालायची आहे. दरची ू वाट चालण्यासाठी नागरिकांची साथ आणि विश्वास आवश्यक असतो. तुम्ही साथ देणारे आणि विश्वासू आहात, याचा अनुभव मी गेली १५ वर्षे घेतो आहे.
तुमचे आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम राहू द्या, ही आपल्या चरणी नम्र विनंती.
आपला,
गणेश बिडकर

राजकीय जबाबदाऱ्या :
आशीर्वाद श्रीनागेश्वराचा
घनकचरा व्यवस्थापन
२४ x ७ पाणीपुरवठा
पुणे महानगरपालिकेची स्वत:ची रक्तपेढी : कै. मधुकर सखाराम बिडकर ब्लड बँक
कौशल्यातून करिअर घडविणारे ‘लाईट हाऊस’
सुरक्षिततेचा भक्कम आधार: १७० सीसीटीव्हींची अद्ययावत कंट्रोल रूम
कमला नेहरु रुग्णालयाचा सुपरस्पेशालिटीकडे प्रवास
पुणे शहराच्या सौंदर्यासाठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प
बहुमजली गणेश पेठ दूधभट्टीचे काम पूर्ण
ट्रॅफिकमुक्त वाहतूकीसाठी उड्डाणपुलांचे जाळे
पुणे मेट्रो: सार्वजनिक वाहतुकीचा पर्यावरणपूरक पर्याय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे माझ्या कारकिर्दीत अनावरण
इलेक्ट्रिक बसचा वापर करणारी पहिली महापालिका
गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महानगरपालिकेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे माझ्या कारकिर्दीत अनावरण
पुणेकरांचे आरोग्य जपणारा – जायका प्रकल्प
सर्वसामान्य व गरजू नागरिकांसाठी महा ई-सेवा केंद्राचा आधार











