पुणे मेट्रो: सार्वजनिक वाहतुकीचा पर्यावरणपूरक पर्याय

पुणे मेट्रो: सार्वजनिक वाहतुकीचा पर्यावरणपूरक पर्याय

सभागृह नेता म्हणून काम करताना पुणे मेट्रोचा प्रकल्प मार्गी लावणे हे माझे मुख्य ध्येय होते. आज पुणेकर मेट्रोने प्रवास करत आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. मेट्रोसोबतच शहरात ५०० हून अधिक इलेक्ट्रिक बसेसचा ताफा सामील करून पुणेकरांना प्रदूषणमुक्त आणि सुखद प्रवासाची भेट दिली. तसेच पुणे रेल्वे स्टेशन येथे ५०० चारचाकी आणि ५०० दुचाकींच्या क्षमतेचे बहुमजली पार्किंग उभारले, ज्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला आहे.

पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विचार केला, तर पुणे शहराच्या भविष्यासाठी मेट्रो सेवा ही अत्यावश्यक होती. २०१७ मध्ये पुणे महानगरपालिकेत भाजपाची सत्ता येताच २०१९ मध्ये मेट्रोची पहिली चाचणी पार पडली. आज पुणे शहरात ३३ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित झाले आहेत. स्वारगेट ते कात्रज, रामवाडी ते वाघोली आणि वनाझ ते चांदणी चौक या विस्तारित मार्गाला मंजुरी मिळाली असून त्याचे काम सुरू होत आहे. शिवाजीनगर ते हिंजवाडी फेज २ या मेट्रो लाईनचे काम अंतिम टप्पात आले असून २०२६ मध्ये हा मेट्रो मार्ग सुरू होईल. याशिवाय खराडी ते खडकवासला आणि नळस्टॉप ते माणिकबाग या मार्गांना केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *