सुरक्षिततेचा भक्कम आधार: १७० सीसीटीव्हींची अद्ययावत कंट्रोल रूम

सुरक्षिततेचा भक्कम आधार: १७० सीसीटीव्हींची अद्ययावत कंट्रोल रूम

पुण्यातील पेठांचा परिसर म्हणजे दाट लोकसंख्येचा भाग. या परिसरात असणारी महत्त्वाची रुग्णालये, शाळा, शासकीय कार्यालये, महत्त्वाचे रहदारीचे चौक यांमुळे या भागातील पोलिस यंत्रणेवर मोठा ताण असतो. हा ताण हलका करण्यासाठी मी माझ्या विकासनिधीतून समर्थ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १७० सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. यासीसीटीव्हीकॅमेऱ्यांमुळे

११ किलोमीटरचा परिसर पोलिसांच्या देखरेखीखाली आला असून, एकूण २४ चौकांचा यात समावेश आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबतच अद्ययावत अशी कंट्रोल रूम उभारण्यात आली आहे. ही यंत्रणा असणारे समर्थ पोलिस स्टेशन हे पुण्यातील पहिले पोलिस स्टेशन ठरले आहे. पुण्यातील पालखी सोहळा असो किंवा गणेश उत्सव  अशा वेळी या सीसीटीव्हींचा मोठा उपयोग पोलिस प्रशासनाला होतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *