

२४ x ७ पाणीपुरवठा
२४ x ७ पाणीपुरवठा पुणे शहराचा झालेला विस्तार आणि वाढलेली लोकसंख्या यामुळे भविष्यात पुणे शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी २४ x ७ समान दाबाने पाणीपुरवठ्याची योजना पुढे आली. भाजपाने पुणे महापालिकेत सत्ता मिळविताच या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू झाले. पुणेकरांना पुरेसे आणि समान पाणी मिळावे, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. कोरोनामुळे […]
पुढे वाचा
ट्रॅफिकमुक्त वाहतूकीसाठी उड्डाणपुलांचे जाळे
ट्रॅफिकमुक्त वाहतूकीसाठी उड्डाणपुलांचे जाळे पुण्याच्या सर्वांगिण विकासासाठी गेली काही वर्षे सातत्याने चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे वाहतूक कोंडी. एकीकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करताना दुसरीकडे पुण्याचा भविष्यातला विस्तार लक्षात घेऊन शहरात उड्डाणपुलांचे जाळे तयार करण्यात आले आहे. यामुळे पुणेकरांचा रोजचा प्रवास हा सुसह्य होणार आहेच त्याबरोबर पुणे शहरातील वाहतूक कोंडीचे प्रश्न कायमचे सुटणार आहेत. चांदणी चौक, […]
पुढे वाचा
घनकचरा व्यवस्थापन
घनकचरा व्यवस्थापन शहरांमधील कचऱ्याचे व्यवस्थापन हा अत्यंत जिकिरीचा आणि दैनंदिन नियोजनाचा विषय आहे. कचरा दररोज निर्माण होत जातो आणि अशा हजारो टन कचऱ्याची विल्हेवाट लावणे, हे आव्हानात्मक असते. ओला कचरा, हॉटेलमधील कचरा, ई-कचरा, जैव कचरा असा विविध प्रकारचा कचरा निर्माण होत असताना त्याचे व्यवस्थापन करण्याचे काम केवळ मनुष्यबळावर साधणारे नाही, हे लक्षात घेऊन उपाययोजना केल्या […]
पुढे वाचा
पुणे मेट्रो: सार्वजनिक वाहतुकीचा पर्यावरणपूरक पर्याय
सार्वजनिक वाहतुकीचा पर्यावरणपूरक पर्याय सभागृह नेता म्हणून काम करताना पुणे मेट्रोचा प्रकल्प मार्गी लावणे हे माझे मुख्य ध्येय होते. आज पुणेकर मेट्रोने प्रवास करत आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. मेट्रोसोबतच शहरात ५०० हून अधिक इलेक्ट्रिक बसेसचा ताफा सामील करून पुणेकरांना प्रदूषणमुक्त आणि सुखद प्रवासाची भेट दिली. तसेच पुणे रेल्वे स्टेशन येथे ५०० चारचाकी आणि […]
पुढे वाचा
आशीर्वाद श्रीनागेश्वराचा
आशीर्वाद श्रीनागेश्वराचा पुण्याच्या मध्यवस्तीतील श्रीनागेश्वराचे मंदिर म्हणजे पुणे शहराच्या जडणघडणीचा जिवंत इतिहास. हा इतिहास जतन करण्यासाठी आणि हा वारसा जपण्यासाठी श्रीनागेश्वराचे मंदिर टिकविणे आवश्यक होते. त्यासाठी मी या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा ध्यास घेतला. पुरातत्व खात्याच्या अखत्यारीतील श्रीनागेश्वराच्या मंदिराचे नवनिर्माण करून दाखविले. माझ्या अथक प्रयत्नांनी आणि महापालिकेच्या खर्चाने पुन्हा दिमाखात उभी राहिलेली ही वास्तू भाविकांसाठी खुली झाली […]
पुढे वाचा
कमला नेहरु रुग्णालयाचा सुपरस्पेशालिटीकडे प्रवास
सार्वजनिक वाहतुकीचा पर्यावरणपूरक पर्याय पुणे शहराच्या मध्यवस्तीतील महत्त्वाचे रुग्णालय म्हणून ‘कमला नेहरू रुग्णालया’कडे पाहिले जाते. मी सातत्याने पाठपुरावा करून या रुग्णालयाचा पूर्णपणे कायापालट केला. पुण्यातील कोणत्याही खासगी रुग्णालयाच्या तोडीस तोड सुविधा या रुग्णालयात उपलब्ध आहेत. गरीब रुग्णांना मोफत उपचार, सवलतीत तपासण्या यांमुळे प्रभागातील आणि पुणे शहरातील नागरिकांना या रुग्णालयाचा मोठा आधार मिळतो. ‘कमला नेहरु रुग्णालया’ला […]
पुढे वाचा
पुणे महानगरपालिकेची स्वत:ची रक्तपेढी : कै. मधुकर सखाराम बिडकर ब्लड बँक
पुणे महानगरपालिकेची स्वत:ची रक्तपेढी : कै. मधुकर सखाराम बिडकर ब्लड बँक माझ्या पुढाकारातून उभारण्यात आलेली ‘कै. मधुकर सखाराम बिडकर ब्लड बँक’ ही पुणे महानगरपालिकेची स्वत:ची पहिली रक्तपेढी आहे. २,२०० स्क्वेअर फूट जागेत विस्तारलेल्या या रक्तपेढीचे वैशिष्ट्य म्हणजे, ही रक्तपेढी २४ तास सुरू असते. या रक्तपेढीचे संचालन ‘पूना मेडिकल रिलिफ अँड रीसर्च फाऊंडेशन’तर्फे करण्यात येत आहे. […]
पुढे वाचा
पुणे शहराच्या सौंदर्यासाठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प
पुणे शहराच्या सौंदर्यासाठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प नदीकाठी वसलेल्या जगातील इतर शहरांमध्ये आमूलाग्र सुधारणा होतात. गुजरातमधील साबरमती नदीचाही अभिनव पद्धतीने विकास करून दाखविण्यात आला. साबरमतीचा कायापालट होऊ शकतो, तर मुळा-मुठेचा का नाही, या विचाराने ‘मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पा’चा आराखडा तयार करण्यात आला. नदीकाठी नियोजनबद्ध विकास करून नागरिकांना विरंगुळ्यासाठी जागा उपलब्ध करून देणे यासाठी हा आराखडा तयार […]
पुढे वाचा
पुणेकरांचे आरोग्य जपणारा – जायका प्रकल्प
पुणेकरांचे आरोग्य जपणारा – जायका प्रकल्प महानगरपालिकेतर्फे हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. ‘जायका प्रकल्पा’अंतर्गत शहरातील १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते नदीत सोडले जाते. ‘जायका प्रकल्पा’साठी ११ नव्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची आणि इतर पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे शहरात तयार होणाऱ्या सांडपाण्यापैकी एक थेंबही नदीत जाणार नाही. हा प्रकल्प पुणे शहराच्या […]
पुढे वाचा
सर्वसामान्य व गरजू नागरिकांसाठी महा ई-सेवा केंद्राचा आधार
सर्वसामान्य व गरजू नागरिकांसाठी महा ई-सेवा केंद्राचा आधार सरकारी कागदपत्रे जमा करणे हे बऱ्याच वेळेला किचकट काम मानले जाते. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी या कागदपत्रांची आवश्यकता असते. नागरिकांना ही कागदपत्रे सुलभतेने मिळावीत, या उद्देशाने ई–सेवा केंद्र सुरू करण्यात आले. आतापर्यंत ७,००० नागरिकांनी ई-सेवा केंद्राच्या सेवांचा लाभ घेतला आहे.
पुढे वाचा
कौशल्यातून करिअर घडविणारे ‘लाईट हाऊस’
कौशल्यातून करिअर घडविणारे ‘लाईट हाऊस’ माझ्या संकल्पनेतून उभा राहिलेला अभिनव प्रकल्प म्हणजे ‘लाईट हाऊस’. ‘लाईट हाऊस’ प्रकल्पाचा मुख्य उद्देश पुण्यातील वंचित तरुणांना, त्यांची कौशल्ये विकसित करून त्यांना करिअरच्या योग्य मार्गावर नेणे हा आहे. याद्वारे १८ ते ३० या वयोगटातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. या प्रकल्पात आत्तापर्यंत १,५०० पेक्षा जास्त युवक-युवतींनी प्रवेश घेतला […]
पुढे वाचा
सुरक्षिततेचा भक्कम आधार: १७० सीसीटीव्हींची अद्ययावत कंट्रोल रूम
सुरक्षिततेचा भक्कम आधार: १७० सीसीटीव्हींची अद्ययावत कंट्रोल रूम पुण्यातील पेठांचा परिसर म्हणजे दाट लोकसंख्येचा भाग. या परिसरात असणारी महत्त्वाची रुग्णालये, शाळा, शासकीय कार्यालये, महत्त्वाचे रहदारीचे चौक यांमुळे या भागातील पोलिस यंत्रणेवर मोठा ताण असतो. हा ताण हलका करण्यासाठी मी माझ्या विकासनिधीतून समर्थ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १७० सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. यासीसीटीव्हीकॅमेऱ्यांमुळे ११ किलोमीटरचा […]
पुढे वाचा
इलेक्ट्रिक बसचा वापर करणारी पहिली महापालिका
इलेक्ट्रिक बसचा वापर करणारी पहिली महापालिका पुणे महापालिकेत सत्तेत आल्यानंतर ‘पीएमपी’च्या सेवेत आमूलाग्र बदल करण्याचे धोरण भाजपाने राबविले. शहराच्या विकासाबाबत दूरदृष्टी असणारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी इलेक्ट्रिक आणि सीएनजी बसेसना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये इलेक्ट्रिक बसेसचा मोठ्या प्रमाणात वापर करणारी पुणे महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे. पुणे महानगरपालिकेच्या […]
पुढे वाचा
बहुमजली गणेश पेठ दूधभट्टीचे काम पूर्ण
सार्वजनिक वाहतुकीचा पर्यावरणपूरक पर्याय गणेश पेठ दूधभट्टीचा परिसर म्हणजे दूध व्यवसायाच्या उलाढालीचे मोठे केंद्र आहे. येथे कायम दूध व्यावसायिकांची वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी आधुनिक सोयी-सुविधांनीयुक्त अशी आधुनिक इमारत उभारण्याचे काम सुरू करण्यात आले. यासाठी मी अडीच कोटी रुपयांची निधी खर्च केला असून, उभ्या राहिलेल्या नव्या दूधभट्टीच्या इमारतीत आता दूध व्यावसायिकांना दुधाचे कॅन थेट दुसऱ्या […]
पुढे वाचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे माझ्या कारकिर्दीत अनावरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे माझ्या कारकिर्दीत अनावरण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुणे महानगरपालिकेत नव्हता. ज्यांच्यापासून अवघा भारत देश प्रेरणा घेतो त्या शिवछत्रपतींचा पुतळा महानगरपालिकेत असायलाच हवा, या भावनेने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महानगरपालिकेत सभागृह नेता म्हणून उभारण्याची संधी मिळाली, याचा अभिमान आहे. पुणे महानगरपालिकेच्या […]
पुढे वाचा
गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महानगरपालिकेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे माझ्या कारकिर्दीत अनावरण
गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महानगरपालिकेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे माझ्या कारकिर्दीत अनावरण पुणे महानगरपालिका स्थापन होऊन ७० वर्षे झाली, मात्र महानगरपालिकेत आदरणीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नव्हता. ज्या महामानवाने आपल्याला राज्यघटना दिली, त्यांच्या कार्याची कायम आठवण राहावी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पुणे महानगरपालिकेत उभारण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा […]
पुढे वाचा



