
२४ x ७ पाणीपुरवठा
पुणे शहराचा झालेला विस्तार आणि वाढलेली लोकसंख्या यामुळे भविष्यात पुणे शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी २४ x ७ समान दाबाने पाणीपुरवठ्याची योजना पुढे आली. भाजपाने पुणे महापालिकेत सत्ता मिळविताच या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू झाले. पुणेकरांना पुरेसे आणि समान पाणी मिळावे, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. कोरोनामुळे या योजनेला मुदतवाढ मिळाली असून, आता ही योजना पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. सर्व पुणेकरांना समान पाणीपुरवठा करणे, पाणी साठवणक्षमता २३ टक्क्यांनवरून ३३ टक्क्यांवर नेणे, शहरात १०० टक्के जलमापक बसविणे आणि पाणीगळतीचे प्रमाण ३५ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर आणणे, ही योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
- ८० पैकी ६५ टाक्यांचे बांधकाम पूर्ण
- १४१ झोनपैकी ४० झोनचे काम पूर्ण
- २,९०,००० पैकी १,८५,००० मीटर्स बसविण्याचे काम पूर्ण



